Marriage | वरात दारात येऊन थांबली अन् नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून हादराल

Marriage | बिहार । लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. आपले लग्न चांगले व्हावे, आपला जोडीदार चांगला असावा असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र लग्नामध्ये काही किस्से असे घडतात की, त्यामुळे सर्वजण हैराण होतात. ऐनवेळी लग्नाला नकार देणे, लग्नासाठी निवडलेला जोडीदार न आवडणे, लग्नमंडपातून पळून जाणे असे अनेक प्रकार लग्नामध्ये घडत असतात. सध्या देखील असाच एक प्रकार बिहारच्या (Bihar) नालंदा जिल्ह्यातून समोर आला आहे.

Bride Suddenly Refused The Marriage

बिहारच्या नालंदा या ठिकाणी नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली. त्यामुळे या घटनेने अनेकजण थक्क झाले. एवढंच नाहीतर, नवरदेव आणि वरातीतील लोकांना मारहाण देखील करण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण?

लग्न थोड्याच वेळात होणार होत. वरात दारात येऊन उभा राहिली आणि त्यावेळी नवरीला समजलं की, नवरदेव म्हणून पाहायला आलेला तरुण वेगळाच होता. तरुणीचं ज्या व्यक्तीसोबत लग्न ठरलं होतं, तो हा नव्हताच. त्यामुळे हे पाहताच नवरीने आणि तिच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला आणि साखरपुड्यासाठी खर्च केलेले 1 लाख रूपये देखील परत मागितले.

नवरीकडच्या लोकांनी वराला घेरलं. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. मात्र गावातील इतर लोकांनी त्यांचं भांडण सोडवलं. त्याचबरोबर गावातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस पथक गावात आले आणि सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं. सध्या आता याबाबत त्यांची चौकशी सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CVgTFa