Maruti Alto K10 CNG | मारुतीची Alto K10 कार CNG व्हर्जनमध्ये लाँच

टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार (Car) लाँच करत असते. अशात मारुतीने नुकतेच आपल्या Alto K10 या कारचे सीएनजी (CNG) व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने ही कार VXI या प्रकारामध्ये लाँच केली आहे. या कार लॉन्चिंगच्या वेळी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, “मारुतीने दहा लाखांहून अधिकार रिटेल केले आहेत. अशा परिस्थितीत कंपनीची Alto K10 CNG ही कार प्रदूषण कमी करण्यात खूप मदत करेल.”

Maruti Alto K10 CNG फीचर्स

मारुतीची Alto K10 CNG ही कार K-series 1.0L Dual VVT इंजिनसह सुसज्ज असून आहे. हे इंजिन 5300RPM वर 41.7kW मॅक्झिमम पॉवर जनरेट करून सीएनजी मोडमध्ये 3400RPM वर 82.1Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही कार सीएनजी वरती 30.85 किमी/किलो मायलेज देते.

Alto K10 CNG ही कार बाजारामध्ये सेंट्रल लॉकिंग, फ्रंट पॉवर विंडो, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 2-DIN स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम, बॉडी-रंगीत डोअर हँडल, स्पीड-सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, मॅन्युअली अॅडजस्टेबल विंग मिरर, रूफ अँटेना इत्यादी फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे.

Alto K10 CNG किंमत

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नुकतेच लाँच केलेल्या Alto K10 CNG या कारची एक्स-शोरुम किंमत 5,94,500 रुपये एवढी आहे. Alto K10 CNG हे मॉडेल लाँच करण्यापूर्वी देशांमध्ये मारुतीचे 13 सीएनजी मॉडेल उपलब्ध आहेत. यामध्ये Celerio,  WagonR, Ertiga, Tour S, Eeco, XL6, Alto 800, Swift, Baleno, Dzire, Alto K10, S-Presso, Super Carry इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.