Maruti Grand Vitara CNG | CNG व्हेरीयंटमध्ये लाँच झाली मारुती ग्रँड विटारा, जाणून घ्या फीचर्स

Maruti Grand Vitara CNG | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruri Suzuki) आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक फीचर्ससह कार (Car) लाँच करत असते. मारुतीने आपल्या एसयूव्ही मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara) चे सीएनजी (CNG) व्हर्जन बाजारामध्ये सादर केले आहे. मारुतीने सादर केलेली ही कार फॅक्टरी फिट सीएनजी किटमधील पहिली एसयूव्ही कार आहे. या कारच्या पेट्रोल मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 10.45 लाख रुपये एवढी आहे.

इंजिन

मारुतीने एसयुव्ही ग्रँड विटारा डेल्टा आणि Zeta यासारख्या सीएनजी प्रकारांसाठी तयार केली आहे. या एसयूव्हीच्या डेल्टा सीएनजीची किंमत 12.85 लाख रुपये आहे. तर Zeta सीएनजीची किंमत 14.84 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1462cc पेट्रोल इंजिन आणि फॅक्टरी फिट सीएनजी किट देण्यात आलेले आहे. हे इंजिन 87.83PS पॉवर आणि CNG वर 121.5Nm टार्क जनरेट करू शकते.

फीचर्स

मारुती सुझुकीच्या ग्रँड विटाराला लाँच झाल्यापासून खूप जास्त मागणी आहे. त्यामुळे या गाडीची विक्री दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात कंपनीने या कारचे सीएनजी मॉडेल बाजारात लाँच केले आहे. यामध्ये हेड-अप डिस्प्ले, ऑटोमॅटिक एसी, 6 एअरबॅग्ज, व्हेंटिलेटेड सीट्स, व्हॉईस असिस्टंट, सुझुकी कनेक्ट, 360-डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग, पॅनोरामिक सनरूफ, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह 9-इंच टचस्क्रीन इत्यादी वैशिष्ट्य उपलब्ध आहे.

किंमत

मारुती सुझुकीने आपल्या ग्रँड विटारा सीएनजी एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत 14.84 लाख रुपये ठेवली आहे. ही कार सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या टोयोटाच्या अर्बन क्रूजर हायलाईडर सीएनजीसोबत स्पर्धा करेल. टोयोटा ही कार ऑटो एक्सपोमध्ये लाँच करणार आहे.

महत्वाच्या बातम्या