मारुती साक्षय आमचा, तुम्ही शब्द दिलता, पण दोन वर्ष कुणीच बघितलं नाय आमच्याकडं, आता तुमी परत आलाय; ग्रामस्थानं फडणवीसांना सुनावलं

कोल्हापूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरची पाहणी करत असताना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. मात्र, हा रोष ठाकरे सरकारविरोधातील नव्हता तर थेट फडणवीस सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन देऊन ते पूर्ण न केल्याचा होता. यावेळी ग्रामस्थांनी थेट फडणवीसांनाच खडेबोल सुनावले.

देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरातील चिखली गावात जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर हे तिन्ही नेते मारुतीच्या मंदिरात आले. यावेळी पूरग्रस्तांनी प्रचंड गर्दी केली होती. मंदिर आणि मंदिराबाहेरही लोक उभे होते. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी माईकचीही व्यवस्था करण्यात आली होती.

त्यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. हा रोष ठाकरे सरकारविरोधातील नव्हता तर थेट फडणवीस सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन देऊन ते पूर्ण न केल्याचा होता. यावेळी ग्रामस्थांनी थेट फडणवीसांनाच खडेबोल सुनावले आहे. देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना संतप्त ग्रामस्थांनी त्यांना कटू सवाल विचारला आहे.

खिडकीबाहेरून एका व्यक्तिने पोटतिडकीने बोलायला सुरुवात केली. त्याचा संताप, मनातील खदखद हा व्यक्ती व्यक्त करत होता. साहेब, मागच्या टायमाला चंद्रकांतदादा आलते. दादांनी पण शब्द दिलता. नाही म्हणत नाही, दादा तुम्ही शब्द दिला होता याच मंदिरात… मारुती साक्षय आमचा… त्याच्यानंतर दोन वर्षे कुठं गेलं वो प्रशासन?, असा संताप या ग्रामस्थाने व्यक्त केला आहे.

कोल्हापूरच्या नागरिकांनी गेल्या वर्षी पुराचा सामना केला आहे. याहीवर्षी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा केला असताना लोकांनी त्यांना प्रश्न विचारून भांबावून सोडलं आहे. त्यानंतर तुम्ही आम्हाला बघितलं नाही. आदित्य ठाकरे साहेब आलते त्यांनी बघितल नाही.

कुणीच बघितलं नाही आमच्याकडे दोन वर्षे… आणि आज तुम्ही परत आलाय इथं… आसचं आता तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही साहेब, हे मी आता तुम्हाला उघड इथेच सांगतो, अशी वेदनाही या ग्रामस्थाने बोलून दाखवली. त्यामुळे फडणवीस आणि पाटीलही काळ स्तब्ध झाले होते.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा