मारुती सुझुकी ने 3.61 लाख रुपयांत लाँच केली 7 सीटर MPV, जाणून घ्या फीचर्स

मारुती सुझुकी ने कमी बजेटमध्ये MPV गाडी लाँच केली आहे. ग्राहक आता हॅचबॅक कारवरून गरजेच्या वाहनांकडे आकर्षित होत आहेत. आता गेल्या काही दिवसांपूर्वीच रेनो ट्रिबर आणि मारुती सुझुकी S-Pressoसारख्या कमी बजेटच्या कारनं बाजारात प्रवेश केलेला आहे. तर Datsun Go Plusला कमी बजेटमुळे मागणी आहे. परंतु आता मारुती सुझुकीनं फक्त 3.61 लाख रुपयांप स्वतःची 7 सीटर MPV बाजारात उतरवली आहे. या नव्या मारुती MPV इकोमध्ये अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. नवं मॉडल पहिल्या किमतीच्या तुलनेत 6 ते 9 हजार रुपयांपर्यंत महागलं आहे. नव्या इकोची दिल्लीतल्या एक्स-शो रुममधील किंमत 3.61 रुपयांपर्यंत आहे.

नव्या इकोमध्ये 1196ccचं चार सिलिंडर असलेलं पेट्रोल इंजिन बसवण्यात आलं आहे. ज्याची ताकद 73hp असून, ते 101Nm टॉर्क निर्माण करते. तसेच या वाहनात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. यातील इंजिन हे ताकदवान असून, किफायतशीर आहे. मारुती इकोचं पर्सनल आणि कमर्शियल दोन्ही गोष्टींसाठी वापर केला जाऊ शकतो.

नव्या मारुती Eecoमध्ये सेफ्टीसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम+ EBD, ड्रायव्हर साइड एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेंसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीनं मिनी SUV, एस-प्रेसोलाही भारतात लाँच केलं होतं, त्याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.