Maruti Upcoming SUV | लवकरच लाँच होणार मारुतीची ‘ही’ नवीन SUV

Maruti Upcoming SUV | टीम महाराष्ट्र देशा: जगामध्ये भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणारा देश आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक कंपनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत अपडेटेड वर्जन आपल्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती देखील आपल्या ग्राहकांना नवनवीन अपडेट्स देण्यात व्यस्त आहे. कंपनी सध्या आपल्या नवीन SUV वर काम करत आहे. मारुतीचे हे येणारे नवीन मॉडेल बोलेनवर आधारित आहे. या मॉडेलचे नाव YTB असण्याचे संकेत आहे. ही मारुतीची नवीन कार ग्राहकांकडून पसंत केली जाईल अशी कंपनी आशा व्यक्त करत आहे. भारतीय कार बाजारामध्ये ही सध्याच्या बलेनो हॅकबॅक पेक्षा वरचे स्थान मिळवू शकते.

टेस्टिंग दरम्यान दिसली ही नवीन Maruti SUV

मारुतीची ही येणारी नवीन SUV टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा पाहण्यात आली आहे ( Maruti Upcoming Car ). त्याचबरोबर या गाडीचा वर्ल्ड प्रीमियर 2023 ऑटो एक्सपो मध्ये होण्याची शक्यता आहे. या गाडीचे इंजिन बद्दल बोलायचे झाले तर या नवीन SUV मध्ये 1.0 L 3- सिलेंडर बूस्टरजेट टर्बोचार्ड पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. जे 100PS पॉवर आउटपुट आणि 150Nm चा पीक टार्क निर्माण करू शकतो.

Baleno S-Cross सारखी असू शकते ही नवीन Maruti Upcoming SUV

मारुतीची येणारी ही नवीन SUV Baleno S-Cross सारखी असण्याची शक्यता आहे. कारण या कारचे इंटिरियर Baleno S-Crossc सोबत मिळते जुळते आहे. या नवीन SUV मध्ये प्रीमियम हॅचबॅक सारखी फ्लोटिंग 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅडजस्टेबल हेडरेस्ट, 360-डिग्री कॅमेरा सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेड्स-अप डिस्प्ले यांसारखी फीचर्स बघायला मिळतील.

मारुती Alto K10 मोठ्या डिस्काउंट उपलब्ध

मारुतीची नुकतीच लाँच झालेली Alto K10 वर कंपनी सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. मारुतीची शिकार फेस्टिव्ह सीजन मधली पहिली कार आहे ज्यावर कंपनी मोठा डिस्काउंट देत आहे. या कारवर कंपनी 39,000 पर्यंत डिस्काउंट ऑफर करत आहे. या कारच्या खरेदीवर 20,000 रुपयांचा डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.