मुंबईत २० मजली इमारतीत भीषण आग; ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी
मुंबई : राज्यात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या ताडदेव परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास एका २० मजली इमारतीत भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण जखमी झाले आहेत. साधारण साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळाची ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
पण या अपघातात सध्या माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत जखमी झालेल्या रुग्णांना स्थानिकांनी आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी परिसरातील ३ बड्या रुग्णालयांनी या रुग्णांना उपचार देण्यास नकार दिला.
त्यामुळे या रुग्णालयांविरोधात संतापाची भावना सध्या सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या जखमींवर सध्या नायर, कस्तुरबा, भाटिया आणि मसीना या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पण यापुर्वी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सुरुवातीला जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी मसीना, वॉकहार्ट आणि एचएन रिलायन्स या रुग्णालयांमध्ये घेवून गेले.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार शांत राहून काम करतात, जाहिरात करत नाहीत; नाना पाटेकरांकडून कौतुकाची थाप
- नाना पाटेकरांचा देखील अमोल कोल्हेंना पाठिंबा म्हणाले…
- जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही; अजित पवारांचाही अमोल कोल्हेंना पाठिंबा
- कितीही नकली गावगुंड समोर आणले तरी जनता नानाला वाजवणारच; अनिल बोंडेंचा इशारा
- भाजपला रामराम ठोकल्यानंतर उत्पल पर्रीकर नारायण राणेंना पत्र
You must log in to post a comment.