मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; दररोज १५,००० थाळ्या जेवण पुरविणार

मुंबई : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागांमध्ये पावसाने कहर केला आहे आणि यातूनच अनेकांचे परिवार उद्ध्वस्त होऊन काहींना आपले जीव देखील गमवावे लागलेत, अनेक भागात पुराचं पाणी गेल्याने मोठं नुकसान झालं. मदतीचा ओघ सुरु असताना आता पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी पुढाकार घेतलाय.

शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून ही टीम आजपासून पूरग्रस्तांना दररोज एकूण 15,000 थाळी रोज जेवण या या पूरग्रस्त भागात पुरवणार आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना, पद्मश्री पुरस्कार विजेते शेफ संजीव कपूर म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले तर अनेकांची घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही.

माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊलदेखील अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबियांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा