InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विजयी झालेल्या धनंजय मुंडेंना पाहून मातोश्रींना अश्रू अनावर, फोटो व्हायरल

- Advertisement -

परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडेंचा विजय झाला. त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडें यांच्या कन्या आणि भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेचा पराभव केला. या विजयानंतर त्यांनी सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. राज्यातील सर्वांचेच या परळी मतदारसंघाकडे लक्ष होते. यामध्ये पंकजा मुंडेंचा धक्कादायक पराभव झाला.

या विजयानंतर धनंजय मुंडें कार्यर्त्यांसह घरी गेले. त्यावेळी मुंडेंसह त्यांच्या आईंनाही अश्रू अनावर झाले होते. माझा धनु जिकंला, माझा धनु निवडणूक आला म्हणत धनंजय मुंडेंच्या मातोश्रींना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी वातावरण अतिशय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. हा मायलेकाच्या गळाभेटीचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

Loading...

संपूर्ण राज्याचं लक्ष हे परळी मतदारसंघाकडे लागलेलं होतं. मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत रंगदार ठरली. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला.

- Advertisement -

Loading...

धनंजय मुंडेंना 30 हजार 701 जिंकले. या विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंकजा यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली आहे. “काहीही झालं असलं तरी रक्ताचं नातं आहे. त्याचं वाईट वाटतं”, असं सांगताना धनंजय मुंडे भावुकही झाले. विजयी मिरवणुकीनंतर धनंजय मुंडे घरी पोहचले तेव्हा यांच्या आईला अश्रू अनावर झाले. त्यांनी धनंजय यांना मीठी मारुन आपला आनंद व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.