समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. यानंतर आता मलिक यांनी पुन्हा एकदा मोठा खुलासा केला. वानखेडे आणि मलिक यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

यावेळी मलिकांनी अनेक कागदपत्रे देखील पत्रकार परिषदेत समोर आणली आहेत. यामुळे ही सगळी कागदपत्र बनावट असल्यास ते राजीनामा देतील आणि आर्यन खानला या प्रकरणी फसवण्यात आलं असून, समीर वानखेडेंना आपली नोकरी गमवावी लागणार असल्याचा दावा देखील नवाब मलिकांनी केला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नबाव मलिकांना केला होता. त्यावर त्यांनी अनेक पुरावेही सादर केले होते.

आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांचं आणि त्यांची पहिली पत्नी डॉ.शबाना कुरेशी यांचा निकाह लावणारे मौलाना समोर आले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर एकच खळबळ माजली आहे. मौलाना मुज्जमिल अहमद असं या मौलानाचं नाव आहे. मुज्जमिल अहम्मद यांनी नवाब मलिकांनी सादर केलेला निकाहनामा खरा असल्याचं म्हटलं आहे. असा धक्कादायक खुलासा मुज्जमिल अहमद यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा