कोरोनाच्या या बिकट काळात सामान्य जनतेला इंधन दरवाढीचा शॉक नको-मायावती

सामान्य माणूस कोरोनाच्या संकटाशी झगडतोय, त्याच्याशी लढा देतोय. या सगळ्या संकटात त्याला इंधन दरवाढीचा शॉक नको, असं वक्तव्य बसपाच्या नेत्या मायावती यांनी केलं आहे. इंधन दरवाढीवरून मायावतींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे .

इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस आणखी त्रस्त झाला आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत, असं मायावतींनी म्हटलं आहे.

दिल्लीमध्ये लवकरच प्लाझ्मा बँक सुरू करणार

चीनच्या मुद्द्यांवर सध्या देशात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं घाणेरडं राजकारण सुरु आहे. सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही, असंही मायावती म्हणाल्या आहेत.

कोरोनाची ट्यून ऐकून कान कंटाळले आहेत ; काँग्रेसच्या आमदाराची कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी

सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही. यांच्या आपसातील लढाईमध्ये सर्वाधिक नुकसान देशाच्या जनतेचं होतं आहे. यांच्या परस्परांच्या लढाईत जनहिताचे मुद्दे दाबले जात आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असं मायावतींनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.