InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मायावतींचा अखिलेश यादवांवर शाब्दिक हल्ला

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीचं समीकरण आता बिघडू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये रविवारी मायावतींच्या उपस्थितीत बसपा पक्षाची बैठक झाली. या बैठकीत मायवतींनी अखिलेश यांच्यावर शाब्दिक हल्ला केला.

या बैठकीत मायावती यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मायावती 25 मिनिटे बोलल्या. यात मायावती म्हणाल्या की, समाजवादी पक्षाचे काही जण सांगतात, आमच्यामुळे बसपाने 10 जागा जिंकल्या त्यांनी पहिलं स्वत:कडे बघावं.

बसपाने साथ दिली म्हणून समाजवादी पक्षाला 5 जागा तरी जिंकता आल्या. पोटनिवडणुकीत आम्हाला हेच दाखवून द्यायचं आहे की जो विजय झाला तो आमच्या बळावर झाला आहे. ज्याचं श्रेय समाजवादी पक्षाचे लोक घेत आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.