InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

#Me too प्रकरणः नाना पाटेकरांविरूद्ध पुरावेच नाही

अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

मात्र, आता ओशिवरा पोलिसांनी कोर्टात बी समरी अहवाल सादर केला असून त्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.