InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आ मेधा कुलकर्णी यांनी अस वक्तव्य करायला नको होतं – खा संजय काकडे

आ कुलकर्णी तशा बोलल्या असतील तर मी माफी मागतो - संजय काकडे

आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधीच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणल्याचे पडसाद आजही पहायला मिळत आहेत. आ कुलकर्णी यांनी अशाप्रकारे वक्तव्य करायला नको होते, अशी भूमिका खा संजय काकडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या वतीने आपण समाजाची माफी मागत असल्याचेही ते म्हणाले.

मराठा क्रांती मोर्चाकडून आज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वतः काकडे यांनी आंदोलनात सहभाग घेत मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे. समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याचं काकडे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाबद्दल केलेल्या व्यक्तव्याबदल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलक महिलांनी केली. तसेच याबद्दलचे निवेदन त्यांनी संजय काकडे यांना दिले आहे.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.