मीडियाला विकाऊ आणि देशद्रोही- अभिनेत्री कंगना राणौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकारातील भांडण तूर्तास तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. या वादानंतर एकीकडे एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने कंगना राणौतवरचा बहिष्कार कायम राहिल, असे जाहीर केले. तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडीओ जारी करत मीडिया आणि पत्रकारांवर निशाणा साधला. मीडियाला विकाऊ आणि देशद्रोही म्हणायलाही ती कचरली नाही.

ज्या पत्रकारासोबत कंगनाचे भांडण झाले होते, त्या पत्रकारालाही कंगनाने लक्ष्य केले. ‘अशाच एका चिंदी पत्रकाराला मी भेटले होते. त्याने माझ्या प्रत्येक गोष्टीची टर उडवली. ती त्याच्या देशद्रोही प्रश्नांचे उत्तर देण्यास नकार दिला. यानंतर त्याने काही लोकांना हाताशी घेऊन एक गिल्ड बनवली. जिला ना मान्यता आहे, ना विचार. याद्वारे त्याने मला धमकावणे सुरु केले. माझ्यावर बॅन आणण्याची धमकी दिली,’ असे ती म्हणाली.

महत्वाच्या बातम्या-

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.