Medicine Purchase | सरकार देणार सर्वसामान्यांना दिलासा! ग्राहकांना औषधांची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची नसणार सक्ती

Medicine Purchase | टीम महाराष्ट्र देशा: गरज नसताना औषधाची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची सक्ती केल्यामुळे ग्राहकांना अनेकदा अनावश्यक खर्च करावा लागतो. त्याचबरोबर औषधांची संपूर्ण स्ट्रीप खरेदी केल्यानंतर औषधींचा अपव्ययही होतो. कारण बहुतांश वेळा रुग्णांना संपूर्ण स्ट्रीपची आवश्यकता भासतं नाही. अशात वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सरकार या समस्यांवर उपाय शोधत आहे.

Consumers will not be forced to buy the entire strip of Medicine 

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक व्यवहार विभागाने फार्म आणि वैद्यकीय उपकरण उद्योगातील वरिष्ठ प्रतिनिधींसोबत याबाबत चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये औषधींसाठी (Medicine Purchase) नवीन पॅकेजिंग तंत्रज्ञान शोधून काढण्याची सूचना देण्यात आलेली असून स्ट्रीप कापण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे.

त्याचबरोबर या बैठकीमध्ये प्रत्येक औषधाच्या (Medicine Purchase) स्ट्रीपवर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट सोबतच QR कोड छापण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी सोय होईल.

दरम्यान, औषधांची (Medicine Purchase) स्ट्रीप कापून न दिल्यामुळे ग्राहकांना अनावश्यक प्रमाणात औषधी विकत घ्यावी लागते. त्यामुळे ग्राहकांना औषधांची स्ट्रीप कापून मिळावी यासाठी सरकार पावलं उचलत आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MqGIAY