InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

२०२२ पर्यंत मीरा भाईंदरला मेट्रो धावणार

नवीन वर्षात मीरा भाईंदर शहरात मेट्रोचे काम अधिक वेगाने सुरू झाले आहे. आज मेट्रो आणि महापालिकेतिल वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी दौरा केला. २०२२ पर्यंत मीरा भाईंदर शहरात मेट्रो प्रत्यक्षात धावणार, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली.

शहरात मेट्रो सुरू करण्याकरता राज्य सरकार पुर्ण मदत करेल

Loading...

मीरा भाईंदर मेट्रोच्या कामासह ३ मोठे फ्लायओव्हर असलेला ‘एलिव्हेटेड रस्ता’ ही या प्रकल्पात उभारला जाणार आहे. शहरात भविष्यात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एलिव्हेटेड रस्ता व त्यात 3 मोठे फ्लायओव्हर बांधले जाणार असून त्यासाठी अतिरिक्त २१७ कोटी रुपये इतका निधी आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘एमएमआरडीऐ’कडून मंजूर करून घेतला आहे.

- Advertisement -

एमएमआरडीए व पालिका अधिकाऱ्यांसह या कामाची पाहणी केल्यानंतर मेट्रो व ‘एलिव्हेटेड रस्ता’ असे काम पुढील २ वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.