InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मल्ल्याळम सुपरस्टार ‘मोहनलाल’ आणि ‘नरेंद्र मोदी’ यांची भेट; राजकीय चर्चेला उधाण

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत खासदारांची संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपाची नजर आता दक्षिण भारताकडे आहे. यासाठी भाजपा केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अशा लोकांच्या चेहऱ्यांच्या शोधात आहे, ज्यामुळे लोकसभा जागा वाढण्यास मदत होईल. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) सुध्दा मागील काही दिवसापासून दक्षिण भारतमध्ये काम करत आहे. सोमवारी मल्याळम ‘सुपरस्टार’ मोहनलाल यांनी पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांची भेट घेतली. या भेटीबदल नरेंद्र मोदीं यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मोहनलाल हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.