Mental Health Care | मानसिक थकवा दूर करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Mental Health Care | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक (Mental) थकवा अधिक जाणवायला लागतो. त्यामुळे माणसाला नेहमी थकल्यासारखे आणि शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटते. आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये मानसिक थकवा येणे ही एक खूप सामान्य गोष्ट आहे. पण याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. अनेकदा लोक मानसिक थकव्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी शारीरिक आणि मानसिक समस्या वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्ही मानसिक थकव्याचे शिकार होत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मानसिक थकवा दूर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा मानसिक थकवा दूर करू शकतात.

कोवळ्या उन्हात बसा

तुम्हाला जर सतत थकवा जाणत असेल, तर तुम्ही दररोज सकाळी थोडा वेळ कोवळ्या उन्हात बसले पाहिजे. स्वतःला रिचार्ज करण्यासाठी सूर्यप्रकाश हा एक रामबाण उपाय आहे. कारण सूर्यप्रकाशाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्याचबरोबर रोज कोवळ्या उन्हात बसल्याने शरीराला विटामिन डी मिळते. त्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होते. म्हणून  दिवसातून किमान 30 मिनिटे तरी कोवळ्या उन्हात बसायला पाहिजे.

व्यायाम

मानसिक थकवा टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा समावेश केला पाहिजे. दररोज व्यायाम केल्याने शरीर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहते. त्यामुळे दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्ही ध्यान आणि योगा देखील करू शकतात.

पुरेशी झोप घ्या

मानसिक थकवा कमी करण्यासाठी गाढ झोप लागणे खूप महत्त्वाची आहे. कारण झोपेच्या कमतरतेमुळे तुमचा मानसिक थकवा वाढू शकतो. मानसिक थकवा टाळण्यासाठी किमान आठ तास झोप घेतली पाहिजे. त्यामुळे झोपेशी संबंधित समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

इलेक्ट्रिक उपकरणांपासून ब्रेक घ्या

आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात आपण आपला बहुतांश वेळ इलेक्ट्रिक उपकरणांवर घालवत असतो. आपण दिवसभर मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर इत्यादी उपकरणांशी जोडले गेलेलो असतो. याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे मानसिक थकवा टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून थोड्यावेळ ब्रेक घ्यायला पाहिजे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.