Mercedes Benz Electric Car | मर्सिडीज बेंजने सादर केली ‘ही’ इलेक्ट्रिक कार

Mercedes Benz Electric Car | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सगळीकडेच इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंज (Mercedes Benz) ने काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात जास्त रेंजची इलेक्ट्रिक कार (Electric Car) EQS 580 लाँच केली होती. ही कार एका चार्जवर 857 किलोमीटर पर्यंत धावू शकते. कंपनीने आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एक पाऊल पुढे टाकत मर्सिडीज बेंज व्हिजन EQXX ही इलेक्ट्रिक कार देशामध्ये सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 1000 किलोमीटर पर्यंत धावू शकते.

कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारमध्ये वीज कंपनीच्या कार्यक्षमतेची विशेष काळजी घेतली आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक मोटार 244hp पॉवर आउटपुट देऊ शकते. त्याचबरोबर या कारमध्ये 100kWh क्षमतेचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

मर्सडीज बेंजने सादर केलेली ही इलेक्ट्रिक कार सूर्यप्रकाशाने देखील चार्ज होऊ शकते. या कारची रेंज वाढवण्यासाठी कंपनीने या कारच्या छतावर सोलर पॅनल दिले आहे. त्यामुळे या कारची रेंज क्षमता दररोज 25 किमी पर्यंत वाढू शकते. कंपनीने दिलेले हे सोलर पॅनल मागील काच झाकून टाकतात, त्यामुळे ही कार चालवायला थोडी कठीण जाऊ शकते.

कंपनीने आपली ही नवीन इलेक्ट्रिक कार अप्रतिम डिझाईनसह सादर केली आहे. या कारमध्ये समोर एक एलईडी लाईटबार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या कारच्या बोनेटवर कंपनीचा लोगो आणि स्टिकर देण्यात आलेले आहे. या कारमध्ये फ्लॅश डोअर हँडल्स उपलब्ध आहे. कंपनीनेही कार बनवण्यासाठी अनेक रिसायकल मटेरियलचा वापर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.