मंदी? मर्सिडीजचे एकाच दिवसात 200 कारची विक्री

जर्मनीची लग्झरी कार निर्मिती कंपनी मर्सिडिज बेंझने नवरात्री आणि दसरा या फेस्टिव सीझनमध्ये तब्बल 200 पेक्षा अधिक कारची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कंपनीच्या कारची विक्री अधिक झाली आहे. यंदा एकट्या मुंबईमध्ये 125 आणि गुजरातमध्ये 74 कारची डिलिव्हरी झाली आहे. कार खरेदी करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, चार्टेड अकाउंटट, वकील आणि उद्योगपतींचा समावेश आहे.

मर्सिडिज बेंजचे भारतातील सीईओ मार्टिन श्वेंक यांनी सांगितले की, दसरा आणि नवरात्रीच्या काळात गुजरात आणि मुंबईतील ग्राहकांची चांगली प्रतिक्रिया मिळाली. 2018 मध्ये देखील अशाच प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला होता. आमच्या यशामागे ग्राहकांचा हात आहे.

कंपनीनुसार, ज्या कारची डिलिव्हरी करण्यात आली त्यामध्ये सी-क्लास, ई-क्लास सेडान, GLC आणि GLE सारख्या गाड्यांचा समावेश आहे. 47 शहरांमध्ये कंपनीचे जाळे पसरलेले आहे. मर्सिडीज बेंझ लवकरच नवीन मॉडेल लाँच करणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.