Merry Christmas | कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या ‘मेरी क्रिसमस’चा पोस्टर रिलीज

Merry Christmas | मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Setupati) हे दोघे त्यांच्या आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) मुळे चर्चेत आहे. हे दोघे या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सोबत दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत नुकतीच एक नवीन अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे.

कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘मेरी क्रिसमस’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दोन हात दिसत असून त्या दोन्ही हातामध्ये ग्लास दिसत आहे. या पोस्टरमध्ये असलेल्या ग्लासच्या काचा तुटलेल्या दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने त्याला कॅप्शन दिले आहे की,”हा चित्रपट तमिळ आणि हिंदी भाषांत 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.” कतरिना कैफने ही माहिती शेअर करताच, चाहते या चित्रपटासाठी अधिक उत्सुक झाले आहे.

कतरिना कैफ आणि विजय सेतूपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘फोन भूत’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर ती सलमान खान आणि इमरान हाशमीसोबत टायगर 3 चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. ती आलिया भट आणि प्रियंका चोप्रासोबत ‘जि ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.