‘मेस्सी’ ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

या खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणार फिफा सर्वोत्कृष्ट खेऴाडूचा पुरस्कार यंदा दिग्गज लिओनेल मेस्सीने मिळवला आहे. मेस्सीने सहाव्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले आहे. इटलीतील मिलानमध्ये फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

यावेळी, फिफा ‘बेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत हा पुरस्कार आपल्या खिशात घातला. तर, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो हिने पहिल्यांदा फिफा ‘वुमन ऑफ द इयर’ चा पुरस्कार जिंकला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.