MI vs RCB | आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यातून रोहित शर्मा आऊट?

MI vs RCB | मुंबई: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ पॉइंट टेबलमध्ये 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. त्यामुळे प्ले ऑफ क्वालिफाय करण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशात सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आरसीबीविरुद्धच्या सामन्यामध्ये खेळणार नसल्याचे म्हटलं जात आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

आरसीबीविरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, गेल्या दोन सामन्यांमध्ये रोहित झिरोवर आउट झाला होता. त्याचबरोबर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी खबरदारी म्हणून खेळणार नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, अद्याप निश्चित कारण समोर आलेलं नाही.

दरम्यान, आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला तब्बल 8 कोटी रुपयांनी आपल्या संघात सामील केले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडावे लागत आहे. आर्चरला पुनर्वसनासाठी इंग्लंडला रवाना करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सकडून 5 सामन्यांमध्ये त्याने 2 विकेट घेतल्या आहेत. त्याने 9.50 च्या इकॉनोमीसह धावा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

You might also like