Micron Investment | तरुणांना मिळणार नव्या रोजगाराच्या संधी! केंद्र सरकारकडून सुमारे 300 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी

Micron Investment | नवी दिल्ली: देशामध्ये तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने सुमारे 300 कोटी रुपयांच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मायक्रॉन या सेमीकंडक्टर कंपनीला केंद्र सरकारने भारतात विस्तार करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही अमेरिकन कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अमेरिकन कंपनी मायक्रॉन (Micron Investment) भारतामध्ये तब्बल 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही कंपनी भारतामध्ये सेमीकंडक्टर टेस्टिंग आणि पॅकेजिंगसाठी उभारणार आहे. याबद्दल सूत्रांचा हवाला देत रॉयटर्स वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

Micron’s plant will be set up in Gujarat

मायक्रॉनचा (Micron Investment) हा प्लांट गुजरातमध्ये उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी या प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यासाठी मायक्रॉन आणि भारत सरकार या संदर्भात करार करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मायक्रॉनच्या (Micron Investment)  या गुंतवणुकीबद्दल मायक्रॉन किंवा भारत सरकारकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिली असल्याचं बोललं जात आहे. परंतु, याबाबत मायक्रॉन आणि भारत सरकार यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/american-chip-company-micron-to-invest-2-7-billion-dollars-in-india/?feed_id=45481