InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बेरोजगारीपाठोपाठ पाण्याअभावी मेळघाटकरांचे स्थलांतर

मेळघाटातील ४ हजार ४५२ कुटुंबांतील १४ हजार ८० लोक मेळघाटबाहेर गेले आहेत. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ८ हजार ५०८ बालकांचा समावेश आहे. बेरोजगारी पाठोपाठ पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी हा पवित्रा घेतला आहे.

मेळघाटातील २७ नळयोजनांसह २४७ हँडपंप बंद पडले आहेत. यात धारणी तालुक्यातील १८९ हँडपंप व सात नळयोजना आणि चिखलदरा तालुक्यातील ५८ हँडपंपांसह २० नळयोजना बंद आहेत.

Loading...

मेळघाटातील धारणी तालुक्यातील २७, तर चिखलदरा तालुक्यातील १४ अशा एकूण ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, १३ बोअरवेलसह ५९ विहिरी कोरड्या पडल्या आहेत. मेळघाटातील ६६ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने जोखीमसदृश पिवळे कार्ड देण्यात आले आहेत.

बहुतांश पाण्याचे स्रोत आटले आहेत. नळ योजना व हँडपंप बंद पडले, कोरड्या विहिरीत उतरून पाण्याचा झारा, पाणी शोधण्याचा प्रयत्न आदिवासी करीत आहेत.

- Advertisement -

You might also like
Loading...

Comments are closed.