Milind Narvekar | … म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवण्यात आली, खरं कारण आलं समोर

Milind Narvekar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. यावर, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असेल, असं सतेज पाटील यांनी म्हटलं होतं. अशातच त्यांच्या सुरक्षे मागंचं कारण समोर आलेलं आहे.

काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होत. नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेलं ट्विट देखील बरंच चर्चेत आलं होत. आता पुन्हा एकदा नार्वेकर यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्यानं नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते तसेच कार्यकर्ते संतापले असून त्यांच्या प्रतिक्रियांमुळे नार्वेकरांची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.

महाविकास आघाडीच्या 25 नेत्यांची सुरक्षा कमी किंवा काढून टाकण्यात आली आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंब आणि शरद पवार यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाय स्तरावर वाढवण्यात आली आहे. नार्वेकरांनी सुरक्षा वाढवल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असेल, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा यामुळेही वाढवली असेल, की त्यांना खरच धोका असेल. दुसरं म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते कुठे जातात? कोणाला भेटतात हे कळण्यासाठी देखील त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असेल असं सतेज पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.