InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

मराठा आरक्षणाला मंजुरी मिळाल्यानंतर आता मुस्लिम आरक्षणाचे काय?, अशा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. असदुद्दीने ओवेसींच्या एमआयएम पक्षाने मुस्लिम आरक्षणासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही. पण मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी उच्च न्यायालयात करणार असल्याचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लिम या दोन्ही सामाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एकूण आरक्षण ७३ टक्क्यांवर पोचले होते. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मराठा आणि मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली. हे करत असताना मुस्लिम समाजाचे सरकारी नोकरीतील पाच टक्के आरक्षण स्थगित केले होते, तर सरकारी शिक्षण संस्थांमधील आरक्षण कायम ठेवले होते.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.