InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम राज्यात 100 जागा लढवण्यासाठी इच्छूक

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम राज्यात 100 जागा लढवण्यासाठी इच्छूक आहे. एमआयएमने आपल्या 100 जागांची यादी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे. लवकरच त्यावर बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि एमआयएम आघाडी करुन लढले होते. विधानसभा निवडणूकही एकत्र लढण्यासाठी एमआयएम इच्छूक आहे. विधानसभा निवडणुकीत एमआयएम राज्यातील 100 जागा लढवण्यासाठी इच्छूक आहे. या जागांची एक यादी प्रकाश आंबेडकरांना नागपूरमध्ये दिली असल्याची माहिती एबीपी माझाला एमआयएमच्या खास सूत्रांकडून मिळाली आहे.

मुस्लीम आणि दलित मतांचं मताधिक्य विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते, अशा जागा एमआयएमने लढवणार असल्याचं सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या यादीत औरंगाबाद जिल्ह्यातील काही जागा आहेत. याशिवाय ठाणे, मुंबई,सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड सह अन्य महाराष्ट्रातील 100 जागांची एक यादी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply