InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांचा मंत्रिमंडळ उपसमितीकडून आढावा

- Advertisement -

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आज मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आढावा घेण्यात आला. महामंडळाने मराठा समाजासाठी नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात  झाली. यावेळी समितीचे सदस्य तथा सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे,जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

महामंडळाने यापूर्वी जाहीर केलेल्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये सहकारी बँकांना राज्य शासनाची हमी देण्यासंदर्भात पत्र पाठविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या योजनेतून आतापर्यंत 76 कोटी 57 लाख 72हजार 157 रुपयांचे कर्ज मराठा समाजातील तरुणांनी घेतले असून या योजनेतील तरुणांना व्याज परतावा सुरू झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महामंडळाने समाजातील तरुणांना आणखी योजना सुरू करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.