मिनिषा लांबा घटस्फोटानंतर पुन्हा पडली ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबाने काही दिवसांपूर्वी पती रायन थामसोबतच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं खुलासा केला होता. यामुळे ती चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता मिनिषा आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मिनिषा लांबाने इन्स्टाग्रामवर दिल्लीचा प्रसिद्ध बिझनेस आकाश मलिकासोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती आकाशच्या हातात हात घालून कॅन्डल लाइट डिनर एन्जॉय करताना दिसत आहे. रिपोर्टनुसार मिनिषा आणि आकाश २०१९ मध्ये एका पोकर चॅम्पियनशिपच्या वेळी भेटले होते. आकाश दिल्लीतील एक प्रसिद्ध बिझनेसमन आहे. पण त्याचा फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही.

मिनिषा लांबानं एक मुलाखतीत आपल्या घटस्फोटावर भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती, ”घटस्फोट घेणं सोपी गोष्ट अजिबात नाही. पण जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा ते सोडून दिलेलंच चांगलं असतं. लग्न किंवा कोणतंही नातं तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं असू शकतं पण ते आयुष्यभरासाठी असू शकत नाही. पण दुर्दैवानं स्त्रीयांची ओळख ही त्यांची नाती आणि वैवाहिक जीवनावरून होते. पण आता परिस्थिती बदलत आहे.” असं मिनिषाने तिचे मत स्पष्ट केले होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा