InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राहुल जगताप यांना भाजप नेते बबनराव पाचपुतेंच आवाहन

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच २०१४ मध्ये सर्वात तरुण आमदार ठरलेले श्रीगोंदायाचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्यापुढे पुन्हा भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आवाहन असणार आहे. मागच्यावेळी तब्बल १३ हजार मतांनी नवख्या जगताप यांनी पाचपुतेंना पराभूत केले होते. त्यामुळे हा विजय २०१९ मध्ये जगताप कायम ठेवणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.

२०१४ मध्ये अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेले राहुल जगताप यांना श्रीगोंदा मतदारसंघातून पुन्हा बबनराव पाचपुतेंचा सामना करावा लागणार आहे. मोदी लाटेत सुद्धा जगताप यांनी ९९ हजार २८१ मतं मिळवत १३ हजार मतांनी पाचपुतेंना पराभूत केले होते. मात्र या पाच वर्षात पाचपुतेनी मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे जगताप यांना यावेळी पाचपुतेंच मोठे आव्हान असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply