InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्नाटकमधील ‘त्या’ आमदारांच्या मनधरणीसाठी मंत्री डी.के. शिवकुमार आज मुंबईत

कर्नाटकात स्थिर सरकार हवे आहे, असा दावा करत मागील काही दिवसांपासून आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत. या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या त्या आमदारांची भेट घेण्यासाठी कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री डी.के. शिवकुमार आज  (बुधवारी) मुंबईत येणार आहेत. शिवकुमार यांच्या भेटीमुळे आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षातील दोन्ही आमदारांच्या झालेला गैरसमज दूर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही दिवसांपासून कर्नाटक मधील १० काँग्रेस आमदार हे मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या सोफिटेल हॉटेलात तळ ठोकून आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच मुंबईत आलेल्या या आमदारांना प्रदेश काँग्रेसच्या एकाही नेत्यांना भेटू दिले जात नाही. तर दुसरीकडे भाजपचे आमदार, पदाधिकारी हे त्यांना भेटत असल्याने याविषयी अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply