InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोबाईल खरेदीत पंकजा मुंडेंचा १०६ कोटींचा घोटाळा : धनंजय मुंडे

८५ हजार अंगणवाडी केंद्रावर सेविकांना देण्यात येणा-या स्मार्टफोन मोबाईल खरेदीत महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे १०६ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

पॅनासोनिक इलुगा १७ हा स्मार्टफोन मोबाईल खरेदी करताना प्रत्येक मोबाईल मागे कंपनीला सुमारे २२०० रूपये जास्तीची रक्कम देण्यात आली आहे. या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत ६ हजार ४९९ रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल ६००० ते ६४०० रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना ८ हजार ७७७ रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे २२०० रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच विभागाने एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून आणखी ५ हजार १०० अतिरिक्त मोबाईल खरेदी केले आहेत.

विशेष म्हणजे, पॅनासोनिक इलुगा १७ हे मॉडेल २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्याची उत्पादने थांबले होते . आता तर हा मोबाईल बाजारात उपलब्धच नाही. त्यामुळे या मोबाईलची विक्री बेकायदेशीररित्याच केली असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

६ हजार ४९९ रूपयांत बाजारात उपलब्ध असेल तर या विभागाने अधिकचे २२०० रूपये का मोजले? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि याची चौकशी करणे गरजेचे आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply