‘अल्पसंख्याक समाजाने भाजपविरोधात मतदान केले’

राज्यात तीन पक्षांचे जरी सरकार आले तरी याचे सगळे श्रेय हे अल्पसंख्याक समाजाला जाते, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. अल्पसंख्याक समाजाने भाजपविरोधात मतदान केले म्हणून राज्यात सत्ताबद्दल दिसून येत आहे, असे पवार म्हणालेत. त्यामुळे आता विरोधकांकडून पवारांना काय प्रत्युत्तर मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे.

पवार यांनीही महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे श्रेय अल्पसंख्याक समाजाला दिले. अल्पसंख्याक समाजानं कुणाला हरवायचे हे ठरवलेले होते. म्हणूनच सत्ताबदल झाला, असे वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत बोलताना केले. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाने भाजपला मतदान केले नाही. जे भाजपला हरवू शकतात, त्यांना मतदान केले, असं पवारांनी यावेळी सांगितले.

 

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.