दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती झाली मिस युनिव्हर्स

यंदा मिस युनिव्हर्स 2019 चा मान साउथ अफ्रिकेच्या सुंदरीनं पटकावला आहे. अमेरिकेतील अटलांटा इथे रविवारी 68व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासोहळ्यात जगभारतील एकूण 90 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. या सगळ्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्स  2019 होण्याचा बहुमान साऊथ अफ्रिकेच्या जोजिबिनी तुंजीने पटकावला आहे. सौंदर्यवती जोजिबिनीने जेव्हा विश्वसुंदरीचा मुकूट परिधान केला तेव्हा ती अति भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

जोजिबिनी ही साउथ अफ्रिकेतील टोस्‍लो इथली रहिवासी आहे. तिने समाजसेवेसाठी वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत उल्लेखनीय कामं केली आहेत. समाजसुधारणेच्या हेतूनं मीडिया कॅम्पेनिंग राबवले आहेत. तिथे जाचक रुढी आणि प्रथांविरोधातही सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवला आहे. जोजिबिनी तुंजीचं स्वत:वर खूप प्रेम आहे. स्वत:वर भरभरून प्रेम करायला हवं असा संदेशही ती इतर महिलांना देते. जोजिबिनी आपल्या तीन बहिणींसोबत टोस्लो इथे राहाते. या स्पर्धेत भाग घेण्याआधी ती केपटाउन इथे पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंटमध्ये इंटरनशिप करत होती. माझे वडिल माझा आदर्श असल्याचंही तिने यावेळी सांगितलं

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.