InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

माणिकराव गावितांचे बेपत्ता पीए गुजरातमध्ये सापडले

काँग्रेसचे खासदार माणिकराव गावितांचे पीए भगवान गिरासे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. ते गुजरातमध्ये सापडले आहेत. गिरासे यांच्या अपहरण झाले असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याबाबत पोलिस तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी भगवान यांना त्यांच्या घरी सुपूर्द केलं असून त्यांचं अपहरण केलं असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. घरी आणल्यापासून भगवान गिरासे अजूनही गुंगीत आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply