‘….तर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत प्रवेश करावा’

‘देवेंद्र फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री. ते सेनेचंही प्रतिनिधित्व करतात’, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. त्यावर ‘त्यांना फडणवीस जर शिवसैनिकांचं प्रतिनिधित्व करतात असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा’, अशी प्रतिक्रिया अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले. त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा समर्थन दर्शवलं आहे.

सध्या निर्माण झालेल्या राजकीय तिढ्यामुळे राज्याचं नुकसान होत आहे, असं सांगत कडू यांनी अगोदर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी मागणी केली. “भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये 50-50 असा फॉर्म्युला ठरला असेल तर सेनेला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काय हरकत आहे. भाजप शब्द देऊन पाळत नसेल तर ती फसवणूक आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

 

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.