InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

तुळजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जनता दरबार घेत नागरिकांच्या महसूल, वीज कंपनीसह विविध विभागांच्या तक्रारी जाणून घेतल्या. जनता दरबारास आमदार पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, तालुका कृषी अधिकारी नामदेव गायकवाड, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आमदार पाटील यांच्याकडे महसूल, वीज कंपनी; तसेच अन्य खात्यांबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. त्यानंतर आमदार पाटील यांनी येथील क्रीडा संकुलाला भेट दिली. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी उपस्थित होते. क्रीडा संकुलामध्ये एक रनिंग ट्रॅक आणि पूर्ण दुरुस्ती करण्याचे तसेच एक व्यायामशाळा उभारण्याचे ठरविण्यात आले.

Loading...

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात आमदार पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी देवानंद रोचकरी, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, दशावतार मठाचे मठाधिपती महंत मावजीनाथ, अरण्य मठाचे महंत अरण्यबुवा, नगर अभियंता श्री. चव्हाण, नगरसेवक अमर मगर, विजय कंदले, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य नागेश नाईक, प्रा. काकासाहेब शिंदे, प्रा. संभाजी भोसले, छावा संघटनेचे जीवनराजे इंगळे, महेश चोपदार, आर्किटेक्‍चर सुहास राऊत, अभिजित कदम, गुड्डू कदम, अण्णासाहेब क्षीरसागर, अविनाश गंगणे, आनंद कंदले, साहेबराव घुगे, जनहित संघटनेचे अजय साळुंखे, कुमार टोले, अर्जुन साळुंखे, नगरसेवक पंडितराव जगदाळे, किशोर पवार, दत्ता सोमाजी, चेतन शिंदे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.