भाजपचे ‘हे’ दाेन आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर….

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत गेलेले बार्शी येथील माजी मंत्री दिलीप सोपल यांना भाजपाचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी चुरशीच्या लढतीत २१९० मतांच्या फरकाने पराभूत केले. राऊत यांनी निवडणुक निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. पण मागील काही दिवसात पुलाखालून बरेच पाणी गेले. आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता आमदार राऊत हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे.

राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याने यापूर्वी भाजपाला पाठिंबा दिलेले अनेक अपक्ष आता महाविकास आघाडीकडे वळू लागलेत. राजेंद्र राऊत यांच्यासोबतच लोहा- कंधारचे श्यामसुंदर शिंदे यांचा यामध्ये समावेश असल्याची चर्चा आहे.

अपक्ष निवडून आलेले आमदार यांचा कल राष्ट्रवादी आणि सेनेकडे जाण्याचा आहे. त्यामुळे सत्तेत वाटा आणि आपल्या मतदारसंघातील कामे झाली पाहिजेत या दृष्टीने सत्तेत जाण्याच्या निर्णय काही अपक्ष आमदार यांनी घेतला आहे.  सोलापूर येथील बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजा राऊत हे राष्ट्रवादी वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभेत महाआघाडी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राऊत हे अनुपस्थित होते.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.