InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आमदार संजय कदम यांची एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा कायम

दापोली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संजय कदम यांच्या विरोधात 2005 मध्ये तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने येथील प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली.

तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण निळकंठराव गेडाम यांच्या सोबत 29 जुलै 2005ला सकाळी 11 वाजेच्या सुमारास झालेल्या बैठकीत कदम आपदग्रस्तांची बाजू मांडत असताना वाद झाला.

सरकारी कामात अडथळा आणि तोडफोड प्रकरणात आमदार संजय कदम यांना दोषी धरण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार कदम यांना प्रथम वर्ग न्यायालयाने 2 डिसेंबर 2015 ला दिलेली एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज देताना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply