InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे’; विनायक मेटे यांचा दावा

भाजपा आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात ज्येष्ठ मीच आहे. त्यांच्यात अनुभवीसुद्धा मीच आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे असं वक्तव्य शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी केलं आहे. विनायक मेटे यांच्या दाव्याने आता भाजपच्या अडचणीत वाढ होणार आहे.

“विधानपरिषद विरोधीपक्षनेतेपदाबद्दल बोलायचं झाल्यास हा सर्वस्वी निर्णय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांसारख्या पक्ष श्रेष्ठींचा आहे. मात्र एक बाब निश्चितपणे सांगतो, विधानपरिषदेत भाजप आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात जेष्ठ मीच आहे. अनुभवी मीच आहे. त्या अर्थाने विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे, असं म्हणतं हा सर्वस्वी निर्णय भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीचा आहे,” असा दावा विनायक मेटे यांनी केला आहे.

Loading...

 

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.