MNS | आरं ‘विंद’ सावंतांच्या थोबाडीत चपराक; पवारांच्या वक्तव्यानंतर मनसेचा टोला

MNS | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने आपले उमेदवार निश्चित करत अर्ज देखील भरले आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असं अवाहन देखील केलं आहे. राज ठाकरेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी असे अवाहन केले आहे.

पवारांच्या या वक्तव्यानंतर आता मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवर एक फेसबुक पोस्ट करत शिवसेना खासदारअरविंद सावंत यांना जोरदार टोला लगावला आहे. ट्विटमध्ये म्हणतात आहे कि, ‘राज’ बोले दल हले! आरं ‘विंद’ सावंतांच्या थोबाडीत चपराक, पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून श्री. शरद पवार आग्रही! असं म्हंटल आहे. मात्र आज राज ठाकरे यांच्या पत्राने आणि शरद पवार यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

शरद पवारांची अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया ( Andheri East Election )

या सर्व घडामोडींवर बोलताना शरद पवार यांनी देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी असे अवाहन केले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधातील अर्ज मागे घ्यावा. अजूनही उमेदवार मागे घेण्यासाठी वेळ असल्याचेही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. दीड वर्षांच्या कालावधीसाठी राजकारण नको असेही शरद पवार म्हणाले.

राज ठाकरे यांचं फडणवीसांना पत्रातून अवाहन

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून ( Andheri East Election ) आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. हा इतिहास आहे, असंही या पत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.