MNS | “आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?”; ‘पठान’ चित्रपटावरुन मनसेचा संतप्त सवाल
MNS | मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘पठान’ चित्रपट खूप वादात सापडला होता. अनेक टीकांनंतर अखेर पठान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, प्रदर्शनानंतरही या चित्रपटावरून राजकीय वाद सुरुच आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक अशा सामन्यामध्ये मनसेकडून सातत्याने विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे. त्यातच आता ‘पठान’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे. मनसेकडून याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
“‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वेळी प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठान’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना जितेंद्र आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?” असा संतप्त सवाल अमेय खोपकरांनी उपस्थित केला आहे.
‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 26, 2023
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या काही दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील काही दृष्य आणि संवादांवर आक्षेप घेत इतिहासाची मोडतोड केली, असा दावा जितेंद्र आव्हाड केला.
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यातील एका मॉलमध्ये चित्रपटाचा शो बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटकही करण्यात आली होती.
आव्हाडांना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणाच्या आधारे मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | जयंत पाटील यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवार म्हणाले…
- Chandrakant Patil | जयंत पाटलांच्या शपथविधी बाबतच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, “असे गौप्यस्फोट…”
- Ashish Shelar | “तोंड बंद करा, नाहीतर मी नावासहित सांगेन की…”; आशिष शेलारांचा इशारा काय?
- Nana Patole | “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची काँग्रेसची परंपरा भाजपने मोडली”; नाना पटोलेंची भाजपवर टीका
- Ashish Shelar |“सुप्रिया सुळेंनी गजनी चित्रपट पुन्हा पाहावा”; आशिष शेलार असं का म्हणाले?
Comments are closed.