MNS | “ऊ.बा.ठा गुजरात निवडणूक लढवणार? की…”; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

 MNS | मुंबई : सगळीकडे निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यावेळी राज्यातील पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज्यातील विरोधीपक्षनेते सत्ताधारी पक्षनेत्यांवर सतत आरोप, टीका करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच गुजरात राज्यामधील निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनसे पक्षाचा (MNS) उद्धव ठाकरेंवर निशाणा

यासंदर्भात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारी शी. ऊ.बा. ठा या वेळेला गुजरात निवडणूक लढवणार ?की उत्तर प्रदेश च्या भव्य यशा नंतर माघार घेणार???.”

संदीप देशपांडे यांनी खोचक सवाल करत उद्धव ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोक केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मनसे पक्षाला काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दोन्ही नेते लवकरच फोनवरुन चर्चा करणार असून यानंतर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.