MNS | “कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला?…”, ‘या’ मनसे नेत्याने उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत आहे. भाजप या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना यांना पाठिंबा देत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देत आहेत. अशातच मनसे पक्षाचे नेते संदीप देशपांडे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

संदीप देशपांडे यांचं उद्धव ठाकरे यांना पत्र –

यादरम्यान, तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुम्ही मुख्यमंत्री पद गमावलं तुम्हाला सहानभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानभूती ठीक आहे पण आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय. आम्हाला सहानभूती कधी मिळणार? 25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार?, असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले आहेत.

कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? कोरोना काळात लपून बसलात त्याची की, पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची?महापौरांच्या मुलाला कोरोना काळात कंत्राट दिलं त्याची सहानभूती पाहिजे की, लोकांचे कोरोनामध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पब ना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे? कोरोनामध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्स नि बिला मध्ये लुटलं त्याची सहानभूती पाहिजे?, असं देखील त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.