MNS | “… तर मुंबई पोखरणारी घुस निघाली”, मनसेचा किशोरी पेडणेकरांना खोचक टोला
MNS | मुंबई : मनसे (MNS) नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना अतिशय कठोर शब्दात टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे. किशोरी पेडणेकर यांची SRA घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काळे यांनी हे ट्विट केलं आहे.
मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं, गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे, मांजर लपून दूध पीत होती तर.या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का आता असं म्हणत चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन ‘भारती सिंग’, असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे.
मनसे (MNS) नेत्याचं ट्विट :
मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं.
गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे ..
मांजर लपून दूध पीत होती तर.या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का आता
चौकशी झालीच पाहिजे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन 'भारती सिंग'#किशोरीभव— Gajanan Kale (@GajananKaleMNS) October 29, 2022
किशोरी पेडणेकर यांनी गोमाता परिसरातील गाळ्यांची पहाणी केली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत एक कुलूप देखील नेला होता. यावेळी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आपोरावर जर हा गाळा माझा असेल तर मी इथे आता टाळा लावेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू असून कोर्टाने स्पष्टपणे लिहून दिलं आहे की माझा त्यात समावेश नाही. यामध्ये ते स्वत: किशोरी पेडणेकर यांचा एसआरएने स्पष्ट केलं आहे’ असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज किशोरी यांची चौकशी होणार आहे. यावेळी, एक तर तोंड बंद कर नाहीतर बोलायचं नाही, असा सोमय्यांचा डाव आहे, त्याला मी बळी पडणार नाही, माझं तोंड बंद करणार नाही, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Bachhu Kadu । “मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, पण…”; बच्चु कडूंचा मोठा खुलासा
- Bachhu Kadu । “आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे, मग भिडू, आता खोकेवाले…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत
- Bacchu Kadu | “आजही मला ठाकरेंबद्दल आस्था पण…”; बच्चू कडू यांनी शिंदेंसोबत जाण्याचे सांगितले कारण
- Government Job Recruitment | भारतीय गुप्तचर विभाग IB यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Explained | शिंदे -फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्र कंगाल, गुजरात मालामाल! हे मोठे प्रकल्प केले दान
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.