MNS | मनसे आक्रमक! राहुल गांधींची सभा उधळण्यास गेलेल्या मनसे नेत्यांना रोखलं
MNS | मुंबई : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज शेगाव येथे जाणार असून तिथे सभा देखील घेणार आहेत. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मनसे (MNS) पक्षाकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शेगाव (Shegaon) येथील सभा उधळण्याचा इशारा संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी दिला होता. अशातच महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने निघालेल्या नेत्यांना रोखण्यात आलं आहे.
पोलिसांनी बुलढाण्यातील चिखली इथं अडवलं, त्यामुळं या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यातच ठिय्या मांडला. यावेळी राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या.
ज्या पद्धतीनं पोलीस वागत आहेत आणि काँग्रेस नेते घाबरले आहेत. जरी नेत्यांना अडवलं असलं तरी आमचे महाराष्ट्र सैनिक थांबणार नाहीत, असं वक्तव्य पोलिसांनी थआंबल्यानंतर अविनाश जाधव यांनी केलं आहे.
मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बईहून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. ठाणे, भिवंडी, नाशिक असा प्रवास करत ते शेगावला पोहोचणार आहेत. तसेच काँग्रेसला चोख उत्तर देणार असल्याचा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा, म्हणाले…
- BJP | “इटालियन पिझ्झाने…” ; शरद पवारांचा VIDEO ट्वीट करत भातखळकरांची राहुल गांधींवर टीका
- Chitra Wagh | “प्यार से जोडने आये हो या नफरत फैलाने?”; चित्रा वाघ यांचा राहुल गांधींना खोचक सवाल
- NZ vs IND 1St T20I | पावसाने घातला धुमाकूळ, सामना वॉशआऊट
- Shraddha Walkar | “…असं वाटणाऱ्या मुलींसोबतच असे प्रकार घडतात”, श्रद्धा वालकर हत्याकंड प्रकरणी ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.