MNS | मनसे आक्रमक! राहुल गांधी यांच्या निषेधार्थ नवी मुंबईत आंदोलन

MNS | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून सावरकर यांचे नातू रणजीत सावरकरांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे. अशातच मनसे (MNS) पक्षाकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) मध्ये अडथळे आणले जात असून पुन्हा एकदा मनसे पक्षाने आक्रमक भूमीका घेत नवी मुंबई येथे आंदोलन सुरु केलं आहे.

या आंदोलनात सायन-पनवेल महामार्ग रोखण्याचा प्रयत्न मनसे कडून करण्यात आला आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधी हाय हायचे नारे देखील लावले.

मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बईहून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली असू ठाणे, भिवंडी, नाशिक असा प्रवास करत ते शेगावला पोहोचले होते. तसेच काँग्रेसला चोख उत्तर देणार असल्याचा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी दिला होता. मआत्र, या नेत्यांना शेगावमध्ये पोहचण्याआधीच अडवण्यात आलं होतं.

राहुल गांधी यांच्या नंतर अनेकांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमीका घेत आंदोलन केलं आहे. तसेच अनेक ठिकाणी राहुल गांधीं विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. एवढंच नाही तर रणजीत सावरकर राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहे. त्यामुळे या भेटीत राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.