MNS | “मुख्यमंत्री राज ठाकरे…”, मनसे नेत्याचं ‘ते’ ट्विट होतय व्हायरल
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची चर्चा होती. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातला एक फोटो शेअर करत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विने अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.
मनोज चव्हाण यांचं ट्विट –
मुख्यमंत्री राज ठाकरे म्हणुन पहायला संपुर्ण महाराष्ट्राला आवडेल, असं या ट्विटला कॅप्शन देण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंचा फोटो शेअर केला आहे. ज्यामागे मुख्यमंत्र्याचा लोगो आहे. असं ट्विट मनोज चव्हाण यांनी केलं आहे.
पाहा ट्विट –
मुख्यमंत्री राज ठाकरे म्हणुन पहायला संपुर्ण महाराष्ट्राला आवडेल @News18lokmat @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @saamTVnews @mnsadhikrut @mns4maha @RajThackeray @rajupatilmanase @SandeepDadarMNS pic.twitter.com/Zm6ocL7HBu
— Manoj B Chavan (@ManojBChavan5) October 16, 2022
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी एक निवेदन देखील एकनाथ शिंदे यांना दिले आहे. पुणे महानगरपालिकेचा १९७० सालचा एक ठराव आहे. ज्यानुसार करपात्र मूल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणे १०% ऐवजी १५% सूट आणि घरमालक स्वतः राहात असेल तर करात ४०% सूट देण्यात यावी असा निर्णय झाला होता आणि इतकी वर्षे त्यानुसार कार्यवाहीही होत होती. पण २०१० नंतर झालेल्या लेखापरीक्षण अहवालात यातील १०% पेक्षा जास्त सूट कायद्याप्रमाणे देता येत नाही आणि यामुळे पुणे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. २०१८ मधे पुन्हा हा आक्षेप घेण्यात आला आणि हा १९७० चा ठराव राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१९ रोजी विखंडित केला. खरंतर हा ठराव पूर्णपणे विखंडित करण्याची आवश्यकताच नव्हती कारण ४०% जी घरभाडयानुसार करात सूट देण्यात येत होती त्याबाबत महालेखापाल किंवा स्थानिक निधी लेखापरीक्षण यांच्या अहवालात १९७० पासून ते २०१८ पर्यंत आक्षेप घेण्यात आलेले नव्हते, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Job Alert | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Maharashtra Rain Update | राज्यात आजही अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
- Pratap Sarnaik | “सुषमा अंधारेंनी आधी आपला…”, प्रताप सरनाईकांचा पलटवार
- Aditya Thackeray | नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- MNS | “कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला?…”, ‘या’ मनसे नेत्याने उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.